loader
Breaking News
Breaking News
Foto

आशासेविका रिया जाधव यांचा अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते सन्मान!

मंडणगड (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक, महान स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या अनुषंगाने मंडणगड तालुक्यातील घोसाळे आदिवासीवाडी येथे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आशासेविका रिया जाधव यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आशासेविका रिया जाधव यांच्या कार्याचे कौतुक करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, "आशासेविका या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. गावातील माता-भगिनी, बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्या अत्यंत निष्ठेने कार्य करतात. अनेक अडचणींवर मात करून समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या अहोरात्र मेहनत घेत असतात. रिया जाधव यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करताना मनस्वी आनंद होत आहे. समाजासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे."

टाईम्स स्पेशल

भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करण्याबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी आणि आरोग्य सेवेसाठी निष्ठेने योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र हिलम, राजेश जाधव, भिकू जाधव, राजाराम जाधव, अजय कोळी, वनिता हिलम, कमल जाधव, सुनीता कोळी, जयश्री जाधव, गंगू हिलम यांच्यासह घोसाळे आदिवासीवाडीतील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg