loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व भेटवस्तू वाटप

खेड (प्रतिनिधी) - दीपावलीनिमित्त खेड नगरपरिषद स्वच्छता विभागातील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना फराळ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. खेड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरपरिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रसंगी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई राजेश बुटाला यांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांना फराळ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा बुटाला यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल आभार मानले. "खेड शहराच्या स्वच्छतेत या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांचे योगदान अमूल्य आहे," असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती तौसिफ खोत, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. फराळ व भेटवस्तू मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. नगरपरिषदेने आपली दिवाळी गोड केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg