काजुर्ली (वार्ताहर): काजुर्ली येथील कै.डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयात सालाबादप्रमाणे यंदाही शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदा उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उत्सवानिमित्त प्रशालेत भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. शारदा देवी ही विद्या, बुद्धी, ज्ञान, कला आणि संगीताची देवता मानली जाते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन व्हावे, या उद्देशाने शारदा उत्सव साजरा केला जातो.
शारदा उत्सवानिमित्त काजुर्ली शाळा क्रमांक १ आणि कै.डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली या दोन्ही शाळांची संयुक्तपणे सरस्वती मातेची मिरवणूक काढण्यात आली. शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मंदार साळवी यांच्या घरातून सरस्वती मातेची मिरवणूक उत्साहात निघाली. मिरवणुकीनंतर प्रशालेत सरस्वती मातेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर विद्यार्थ्यांनी भक्तिमय भजन सादर केले. विद्यार्थिनींनी टिपरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्रितपणे गरबा नृत्याचा आनंद घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे प्रशालेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमानिमित्त भातगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गावणकर, काजुर्ली शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक म्हस्के, काजुर्ली शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक काकडे, काजुर्ली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश गुरव व उपाध्यक्ष संतोष पालकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे यांनी प्रशालेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग, सहाय्यक शिक्षिका परविन तडवी, वर्षा पवार, पल्लवी महाडिक व वैष्णवी पावरी उपस्थित होत्या. तसेच स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य आबा खानविलकर, समितीच्या सदस्या व गावच्या पोलीस पाटील सीमा लिंगायत, सदस्या प्रमिला पांचाळ, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मंदार साळवी, मनोज गुरव यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, भक्तिभाव आणि सांघिक सहभाग यांचे महत्त्व अनुभवता आले. दोन्ही शाळांच्या संयुक्त सहभागामुळे शैक्षणिक व सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शारदा उत्सव आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.