loader
Breaking News
Breaking News
Foto

​सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकारांचा २४ ऑक्टोबरला माजगाव येथे मेळावा

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा श्रीगणेश मूर्तिकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मूर्तिकारांचा विशेष मेळावा शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक हॉल, माजगाव भटवाडी (ता. सावंतवाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे. ​या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मालवण-कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सच्चिदानंद (संजू) परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर आणि पत्रकार सीताराम गावडे उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मेळाव्यात मूर्तिकारांच्या विविध प्रमुख समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने: ​मूर्तिकारांचा कलाकारांच्या यादीत समावेश करणे, गोवा सरकारच्या धर्तीवर मूर्तिकारांना मानधन देणे, ​'सिंधुरत्न' योजनेतून मूर्तिकारांना साहित्य खरेदीची सुविधा उपलब्ध करून देणे, मुंबई महानगरपालिकेप्रमाणे शाडूमातीचा पुरवठा करणे, जिल्ह्याबाहेरील मूर्तिकारांकडून होणाऱ्या दमदाटीबाबत उपाययोजना करणे आदी वर चर्चा केली जाणार आहे. ​जिल्ह्यातील सर्व श्रीगणेश मूर्तिकारांनी या मेळाव्यास वेळेवर उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बापू सावंत व संचालक मंडळ, श्रीगणेश मूर्तिकार संघ यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg