loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सदस्यांच्या सहकार्यातून विशेष विद्यार्थ्यांच्या दिवाळी कंदिलांची विक्री

खेड, - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि अनुग्रह विशेष शाळा, वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांच्या विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला लायन्स क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मोलाचे सहकार्य केले. विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी कंदिलांच्या विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमात लायन्स क्लबच्या सदस्यांनी स्वतःसाठी तसेच आपल्या मित्रपरिवारासाठी कंदील खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या विक्री उपक्रमासाठी विजय फटाका मार्टचे मालक आदित्य चिखले यांनी स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे कंदिलांच्या विक्रीसाठी योग्य जागा मिळाली. तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे यांनी विविध क्लब सदस्यांशी संपर्क साधून कंदिलांच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सचिव लायन उत्तम कांबळे, लायन विवेक कदम आणि लायन डॉ. ज्ञानेश्वर मरकड, माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर उपस्थित होते. विशेष विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्यातून तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सहकार्य करून लायन्स क्लबच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. अशा उपक्रमांमुळे विशेष विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg