बांदा : (प्रतिनिधी) - शेर्ले दुकानवाडी येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अशोक एकनाथ धुरी, जयवंत एकनाथ धुरी आणि जगन्नाथ एकनाथ धुरी यांच्या दुकानाचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत दुकानाचे चार गाळे, आतील चार गोडाऊन खोल्या, किराणा साहित्य, भुसार माल, वजनकाटे, फ्रिज, मसाला कांडप मशीन, रॅक, महत्त्वाची कागदपत्रे तसेच दुकानाच्या भिंती जळून खाक झाल्या. दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मालाची साठवणूक करण्यात आली होती. त्यामुळे धुरी कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी अशोक एकनाथ धुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, बांदा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा उंच उसळू लागल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शेर्ले, बांदा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुकानातील शक्य तितके साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळाल्यानंतर रात्री १२.१५ वाजता सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने एका बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कुडाळ, वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर चारही ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यरात्रीपासून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सणासुदीच्या काळात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून ठेवली असताना ही दुर्घटना घडल्याने धुरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मेहनतीने उभा केलेला व्यवसाय काही तासांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेर्ले दुकानवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.