मंडणगड (प्रतिनिधी) : आद्य क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंडणगड तालुक्यातील पाचरळ येथील ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे यांचा मंडणगड येथील ग्राम महसूल अधिकारी भवन येथे सन्मान करण्यात आला. महसूल विभागातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, महसूलविषयक कागदपत्रे, जमिनीच्या नोंदी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या जबाबदाऱ्या पार पाडताना नागरिकांशी समन्वय ठेवून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे यांनी महसूल क्षेत्रात केलेले कार्य आणि प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना दिलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. शासकीय सेवेत कार्यरत असताना जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही सकारात्मक बाब आहे. अशा गौरवामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळतेच, शिवाय इतरांनाही आपले कर्तव्य अधिक निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडण्याची प्रेरणा मिळते, असे मत देवळेकर यांनी व्यक्त केले.
आद्य क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक योगदान, कर्तव्यनिष्ठा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून समाजात कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, देव्हारेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, पालवणीचे ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे तसेच ग्राम महसूल अधिकारी सिद्धी भोईर उपस्थित होत्या.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.