संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात यावर्षी पीक पाहणी सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, तालुक्यात सुमारे ८ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाताचे लागवड क्षेत्र जवळपास स्थिर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर्षी नाचणीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून ते सुमारे १२०.७६ हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी नाचणीचे क्षेत्र सुमारे १०० हेक्टर होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक पाहणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सर्व्हे नंबर टाकल्यानंतर चुकीचा सातबारा दिसणे, पीक नोंदणी करताना अडथळे निर्माण होणे तसेच ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न होणे, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असून, प्रत्यक्ष शेतातील पीक आणि ऑनलाइन नोंद यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पीक पाहणीची नोंद अचूक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारे विविध शासकीय योजना, मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया होत असल्याने ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींचा शेतकऱ्यांना फटका बसू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
ऑनलाइन पीक पाहणी करताना अनेक अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष शेतातील पीक आणि ऑनलाइन नोंद यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित यंत्रणेने तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी शेतकरी बंड्या लिंगायत यांनी केली. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यात शेती क्षेत्रावरही विविध कारणांचा परिणाम होत आहे. विशेषतः जंगली प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी शेती करण्यास कंटाळले आहेत. पिकांचे नुकसान होत असतानाही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रगतशील शेतकरी नाना हळबे यांनी व्यक्त केले. पीक पाहणी सर्वेक्षण अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याबरोबरच ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.