सावंतवाडी (प्रतिनिधी) : एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गावागावात सध्या वनराई बंधारे उभारण्यात येत आहेत. तालुक्यातील मळगाव गावात श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या वनराई बंधार्यांची मंगळवारी तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत गावात इतरही ठिकाणी बंधारे बांधण्याविषयी आवाहन केले. यावेळी तिलारी पाटबंधारे विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, उपविभागीय अभियंता महादेव दळवी, जळगाव ग्रामपंचायतचे प्रशासक संजय शेळके, माजी पंचायत समिती सभापती राजू परब, शासकीय ठेकेदार प्रसाद नाईक, स्थानिक ग्रामस्थ निलेश राऊळ, अक्षय रेडकर आदी उपस्थित होते.
यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अक्षरशः दडी मारल्याने सद्यस्थितीत दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. भात पिके करपून गेली आहेत. तर जलस्त्रोत देखील आटत असून नदी, तलाव, विहिरी यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून गावागावात वनराई बंधारे उभारण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. या अनुषंगाने मळगाव येथे भूतनाथ मंदिर परिसरात पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगत असलेला मोठा बंधारा तसेच गावात पण अन्य ठिकाणीही स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून बंधारे उभारण्यात येत आहेत. यात महिलांनीही पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला आहे.
या सर्व बंधाऱ्यांची मंगळवारी तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मळगाव येथील बंधाऱ्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भूतनाथ मंदिर लगत असलेला मोठा बंधारा, ब्राह्मण आळी, रेडकरवाडी झरी तसेच जोशी मांजरेकर वाडी येथील वझर बंधाऱ्याची पाहणी केली. स्थानिकांनी श्रमदानातून उभारलेल्या या बंधार्यांची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. गावात अन्य ठिकाणीही बंधारे बांधण्यात यावेत यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.