loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरॅक्ट क्लबच्या गणपती सजावट स्पर्धेला प्रतिसाद, कुणाल वेंगुर्लेकर प्रथम तर प्रसन्न राणे द्वितीय

सावंतवाडी, : रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित ‘माझा बाप्पा, माझी सजावट’ या गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत कुणाल वेंगुर्लेकर यांनी प्रथम क्रमांक, प्रसन्न राणे यांनी द्वितीय क्रमांक, तर संतोष खानविलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. किंजल गुजर यांना विशेष प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध संकल्पना, आकर्षक सजावट आणि कलात्मकतेच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपल्या घरातील गणरायाची सजावट केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील विजेत्यांचे रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेसाठी रोटरॅक्टर समिक्षा मडगांवकर, रोटरॅक्टर सिद्धेश धारगळकर, रोटेरीयन विनय काणेकर आणि रोटरॅक्टर मिहिर मठकर यांचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले. स्पर्धेचे आयोजन क्लब प्रेसिडेंट रोटरॅक्टर श्रीया मठकर आणि सेक्रेटरी रोटरॅक्टर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक आमच्यासाठी विजेताच आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे प्रायोजक, क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. यापुढेही रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा श्रीया मठकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg