loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगाव मजगांव मुरुड मध्ये नवरात्रोत्सव उत्साहात

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)मुरूड शहरासह तालुक्यातील नांदगाव मजगांव विविध ठिकाणी यंदा सुमारे 63 ते 76 ठिकाणी सार्वजनिक व खाजगी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यंदा ग्रामीण भागातही सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन वाढते असल्याचे दिसून येत आहे.आदिवासी बांधवातूनही नवरात्र उसत्वाची क्रेझ वाढती असल्याने दिसून येते. नांदगाव, तिसले, सर्वे, आगरदांडा आदी परिसरात आपले आदिवासी बांधव देखील नवरात्र उत्सव साजरा करताना दिसून येतात.नवरात्रोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करावा अनुचित प्रकार घडणार नाही अशी काळजी घ्यावी.असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुरूड शहरात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठी आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई, करण्यात आलेली होती.रास दांडिया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा या निमित्ताने घेण्यात आल्या.मुरूड शहराची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवीच्या मंदिरात देखील दर वर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष नयन(नरेश) कर्णिक यांनी दिली.कोटेश्वरी ट्रस्ट हा रजिस्टर्ड ट्रस्ट असून 18 सदस्य असणारी सर्व कार्यकारीणी समर्पित भावनेतून एकूण नियोजन आणि काम पहाते. घटस्थापना, भजन, नवचंडी होम,आरती व दस-याच्या दिवशी श्री कोटेश्वरी मंदिर प्रांगणात सीमोल्लंघन आदी. विविध धार्मिक कार्यक्रम नऊ दिवसात साजरे करण्यात आले.अशी माहिती नयन कर्णिक यांनी दिली.नवरात्रोत्सवात श्री कोटेश्वरी मंदिरात देवीला सकाळी 'घोसाळ्याचा कळा ' वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी असते.सदर देवस्थान ऐतिहासिक काळातील असून साक्षात्कारी मानले जाते.नवरात्रोत्सवात तर देवीचे दुरदूरवरील भक्त खास नवस फेडण्यासाठी येत असतात.देवीचे मुळस्थान मुरूड च्या पद्मजलदुर्गातील आहे.अशी माहीती उपलब्ध आहे.मुरूड शहराच्या प्रवेश सीमेवर असणारे श्री कोटेश्वरी देवीचे मंदिर प्रशस्त,सुंदर असून जीर्णोद्धार देखील झालेला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg