loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुका व्यापारी संघटना महिला विभागातर्फे जालगाव येथे नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात

दापोली (वार्ताहर) : दापोली तालुका व्यापारी संघटना महिला विभागातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन दापोली तालुक्यातील श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालय जालगाव येथे करण्यात आले होते. दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रणाली वालावलकर, पूजा चव्हाण, सारीका गुजराथी, नीलम जाधव, प्रणाली गुरव, माधुरी विचारे, समिधा मेहता, साक्षी बेंडल आणि डॉ. रश्मी जोशी या नवदुर्गांचा सन्मान सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम आणि दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, पंचायत समिती दापोलीच्या उपसभापती नम्रता तोडणकर आणि जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या मार्गदर्शनात श्रेया कदम म्हणाल्या सर्वत्र उद्योजक मेळावे पहायला मिळतात पण आज नवरात्र उत्सवानिमित्त उद्योजिका मेळावा, महिला नवदुर्गांचा सन्मान कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. दापोली तालुका महिला उद्योजकांच्या पाठीशी आपण व योगेश कदम राहू असे त्यांनी आश्वासित केले. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोली पंचायत समिती उपसभापती नम्रता तोडणकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा कविता मालू, सचिव अस्मिता परांजपे, खजिनदार आश्लेषा फाटक, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, खजिनदार मयुरेश फाटक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमती अमृते यांनी तर प्रास्ताविक सचिव अस्मिता परांजपे यांनी केले. महिला विभाग अध्यक्ष कविता मालू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले केल्यानंतर तालुका सचिव मिलिंद शेठ यांनी आभार व्यक्त केले. रेणू सावंत यांच्या पसायदान सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या नवदुर्गा सन्मान सोहळ्यासाठी दापोली तालुक्यातील व्यापारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg