loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई निवड चाचणी शूटिंगबॉल स्पर्धेत, मुंबई महानगरपालिका अजिंक्य!

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई निवड चाचणी शूटिंगबॉल स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत नामांकित मुंबई महानगरपालिका संघाने मुंबई पोर्ट अथोरीटी (एमबीपीटी) संघाचा २१–१५ गुणांनी पराभव करीत विजेतपद पटकावले. तृतीय क्रमांक आरमार विक्रांत स्पोर्ट्स क्लब, चतुर्थ क्रमांक मुंबई महानगरपालिका ब्ल्यू स्पोर्ट क्लब. मालिकावीर : भूषण मेस्त्री, आणि सर्वोत्कृष्ट शूटर : मयूर प्रजापती यांची निवड करण्यात आली. पी एम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब ट्रस्ट, गिरगाव चौपाटी, मुंबई यांच्या विद्यमाने आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने मुंबई निवड चाचणी शूटिंगबॉल स्पर्धा २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईतील नोंदणीकृत १३ संघानी सहभाग घेतला. गिरगाव चौपाटीवर असलेल्या निसर्ग सुंदर बंदिस्त क्रीडांगणात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मफतलाल ट्रस्टचे माजी सचिव भूषण जॅक, सचिव शहा, मुंबई शूटिंगबॉल असो.चे सरचिटणीस दीपक सावंत व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संघांची विभागणी चार गटात करून साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले, त्यामुळे प्रत्येक संघाला किमान दोन सामने खेळून आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळाली. या क्रीडावर्षातील मुंबईतील ही पहिलीच स्पर्धा असल्याने खेळाडूना विशेष उत्साह होता. निवड समितीने या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंची गुणवत्ता, सातत्य, कौशल्य विचारत घेऊन पंधरा खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात आली. या निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे एक शिबिर घेऊन त्यातून यथावकाश अंतिम संघ निवड व कर्णधार निवड जाहीर केली जाईल. स्पर्धा आयोजनासाठी आयोजक, ट्रस्टचे माजी सचिव भूषण जॅक, सचिव शाह तसेच सर्व पदाधिकारी यांनी अमूल्य सहकार्य केले. तसेच मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व संघ, खेळाडू यांचे योगदान खूप महत्वाचे होते. आयोजकांचे स्पर्धा आयोजन, व्यवस्थापन, क्रीडांगण व्यवस्था, अल्पोपहार, खानपान व्यवस्था खूपच उल्लेखनीय होती. गिरगाव चौपाटी समुद्र किनारी पण बंदिस्त असलेल्या सुंदर क्रीडांगणात, उत्कृष्ट विद्युत व्यवस्था केलेली होती. सर्व प्रेक्षक व क्रीडाप्रेमी, खेळाडू यांना समुद्रकिनाऱ्याचे नरिमन पॉईंट ते राजभवन असे सुंदर विलोभनीय दृश्य पाहून संग्रही साठवता आले. स्मरणात राहील अशी ही स्पर्धा होती.

टाईम्स स्पेशल

मंत्रीमहोदय मंगलप्रभात लोढा, मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी क्रीडाप्रेमी उत्तम भगत तसेच मुंबईचे माजी कर्णधार आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल खेळाडू मोहन पेडणेकर यांची उपस्थिती व मार्गदर्शन खेळाडूना खूप प्रेरणादायी होते. स्पर्धनियंत्रक – प्रफुल्लकांत वाईरकर व स्पर्धा निरीक्षक– रत्नदीप रावराणे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप वाघ, उपाध्यक्ष मंगेश भोसले, कार्याध्यक्ष जालंदर चकोर, कार्यकारिणी सदस्य विद्याधर जामसंडेकर, कुमार वाईरकर, दिलीप मालंडकर या सर्वांचे सहकार्य लाभले; या सर्व संबंधिताना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्यामभाई सावंत व सरचिटणीस यांच्या अधिपत्याखाली मुंबईत वेगवेगळ्या विभागात अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईत राष्ट्रीय मिल मजदुर संघ यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg