loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याण-डोंबिवलीच्या पुढील २५ वर्षांच्या पाणीप्रश्नासाठी सर्वंकष नियोजन करा; सल्लागार नेमण्याची दिपेश पुंडलिक म्हात्रे यांची मागणी

डोंबिवली [ वार्ताहर ] कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत महानगरपालिकेसाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या दृष्टीने सल्लागार नेमण्याचा आयत्यावेळचा विषय मांडण्यात आला होता. या विषयावर भाष्य करताना दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी शहराच्या पुढील २५ वर्षांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी दूरदृष्टीने आणि सर्वंकष नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांच्या एकत्रित पाणीपुरवठ्याबाबत शासनाने धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करताना, धरण उभारणीचे काम जलसंपदा विभागाच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे धरण उभारण्याची जबाबदारी संबंधित विभाग पार पाडेल; मात्र धरण बांधल्यानंतर शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर व्यवस्थांचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी स्पष्ट केले.धरण बांधले म्हणजे शहराचा पाणीप्रश्न सुटेलच असे नाही. भविष्यात धरण उभारण्यासाठी योग्य ठरू शकणारे आणि पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता असलेले पाणलोट क्षेत्र निश्चित करणे, त्या क्षेत्रातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाणी कल्याण-डोंबिवलीपर्यंत आणण्याची शक्यता तपासणे, आवश्यक जलवाहिन्या उभारणे, जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करणे आणि त्यानंतर ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.या सर्व बाबींचा तांत्रिक, आर्थिक आणि व्यवहार्यतेच्या दृष्टीने सखोल अभ्यास करून एक सर्वंकष आराखडा तयार करणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करावे, अशी भूमिका दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी मांडली.

टाइम्स स्पेशल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भविष्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आजच ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. योग्य पाणलोट क्षेत्राची निवड, पाणी आणण्याची व्यवस्था, जलशुद्धीकरण आणि वितरण या सर्व बाबींचा एकत्रित आराखडा तयार केल्यास शहराच्या पुढील २५ वर्षांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडू शकते.याच भूमिकेतून दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी महासभेत आयुक्त आणि महापौर यांच्याकडे सल्लागार नेमण्याची पोटतिडकीने मागणी केली. नागरिकांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन या विषयाला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली.कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना पुढील २५ वर्षे पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी आजच योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे असेही नगरसेवक म्हात्रे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg