केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अलिकडेच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही या महामार्गावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना जुनी धोकादायक वळणे तसेच अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) काढणे गरजेचे होते. परंतु, अत्यंत गंभीर बाब म्हणजे प्रशासनाने ही धोकादायक वळणे ‘जैसे थे’ ठेवली आहेत. त्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गावरील अत्यंत गाजणारे लांजातील आंजणारी, वेरळ आणि त्यासारखी इतर अनेक अपघात प्रवण क्षेत्रे आजही तशीच आहेत. रस्ता चारपदरी झाला असला, तरी ही वळणे सरळ न केल्यामुळे वाहनांचा वेग आणि अपघातांचा धोका दुपटीने वाढला आहे.
रस्ता मोठा झाला पण वळण तिथेच आहे, आंजणारीच्या तीव्र उताराच्या वळणावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांकडून उमटत आहे. या वळणांवर रोज लहान-मोठे अपघात होत असताना प्रशासन मात्र ढिम्म असुन धोकादायक वळणे आणि अपघात क्षेत्रांची दुर्लक्षता: होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे चौपदरीकरण करताना रस्त्यांच्या कडेला काँक्रीटची बंदिस्त गटारे बांधण्यात आलेली आहेत पावसाचे पाणि गटारांमधून निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटाराला होल ठेवण्यात आले आहेत. मात्र बंदिस्त गटारांचे नियोजन पूर्णपणे चुकले आहे. या गटारांमधून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी, पावसाचे किंवा साचलेले पाणी गटारावरून उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरत आहे. यामुळे व्यापार्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
तसेच रस्त्याला योग्य लेव्हल नाही. अनेक ठिकाणी रस्ता रॅण्डम पद्धतीने उंच-सखल करण्यात आला आहे, ज्यामुळे वाहने वेगात असताना अनियंत्रित होण्याची भीती निर्माण झाली आहे. तांत्रिक निकष धाब्यावर ठेवून काम केल्याचे स्पष्ट दिसत आहे. रस्त्यावरील या अनेक गंभीर त्रुटींमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने तात्काळ या त्रुटींची दखल घेऊन वळणे सुधारावीत, रस्त्याची लेव्हल नीट करावी आणि गटारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनतेतून दिला जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.