मालवण (प्रतिनिधी) - घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात घरेलू कामगार तसेच गरजू कामगारांनी सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. कामगार वर्गातील अनेक जण दैनंदिन कामाच्या धावपळीत आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ मालवणने सामाजिक बांधिलकी जपत या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले.धनुर्वातासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता या उपक्रमाचा कामगार वर्गाला लाभ देण्यात आला.
या शिबिराच्या आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांच्यासह जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर यांनी सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले. लायन्स क्लब च्या माध्यमातून नेहमीच जनहिताचे उपक्रम राबवले जातात. सामाजिक गरजू घटकांसाठी आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने लायन्स क्लब ऑफ मालवणच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.