loader
Breaking News
Breaking News
Foto

कीर्तनाचार्य ह. भ. प. श्रीपाद ढोलेबुवा यांचे निधन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तिपरायण श्रीपादबुवा रामकृष्ण ढोले यांचे काल (१० नोव्हेंबर २०२६) रात्री निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आज रत्नागिरी शहरातील चर्मालय येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पणजोबांपासून चालत आलेली घराण्याची कीर्तनपरंपरा ढोलेबुवा यांनी पुढे नेली. त्यांनी ह. भ. प. नरहरबुवा कऱ्हाडकर आणि ह. भ. प. रामचंद्रबुवा कऱ्हाडकर यांच्याकडे आठ वर्षे गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३१ मे १९३८ रोजी मुंबईत गिरगावमध्ये श्रीपादबुवांचा जन्म झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे हे त्यांचे मूळ गाव. गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य रत्नागिरीत होते. महाराष्ट्रासह राज्याबाहेरही त्यांनी १४ हजारांहून अधिक कीर्तने सादर केली होती. वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत त्यांनी कीर्तनसेवा केली. गोव्यातील कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी तीन वर्षे काम पाहिले होते. ढोलेबुवांनी १२ चातुर्मास्य कीर्तनयाग केले. त्यामध्ये संपूर्ण चातुर्मासात दर दिवशी वेगळे आख्यान घेऊन कीर्तन केले जाते. हा उपक्रम प्रचंड अभ्यास आणि व्यासंगाशिवाय शक्यच होऊ शकत नाही. अशा मोजक्या ज्येष्ठ कीर्तनकारांपैकी श्रीपादबुवा हे एक होते.

टाईम्स स्पेशल

कीर्तनसेवेबद्दल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांच्या सरकारांनी ढोलेबुवांचा सन्मान केला होता. तसेच शृंगेरी शंकराचार्य पीठातर्फेही त्यांचा सत्कार झाला होता. कोल्हापूरच्या अखिल भारतीय कीर्तन संमेलनात त्यांना गौरवण्यात आले होते. तसेच, रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवातही राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते ढोले बुवांचा गौरव करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg