loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम सचिन भंडारे, आराध्या शिवाजी कोकाटे आणि वेदांत प्रसाद देवाडीगा यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मयुरेश विकास राजपूत, आर्यकुमार राकेश मर्चंडे, हेमांगी वामन मेंढे आणि दिशा दिनेश चौधरी यांनी यश मिळविले. तसेच तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सई सुरेश पाटील, उझैर किफायत दाबीर, समर्थ विक्रांत खडपेकर, ऱ्हिदान प्रीतम पटणे, शुभ्रा विशाल म्हाब्दी, बंसी मयूर पटेल, विहान कैलासनाथ भोसले, स्वरा सतीश चव्हाण आणि शौर्य संजय पवार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक दिपक कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ.उपेंद्र तलाठी, संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका भूमिता पटेल व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg