loader
Breaking News
Breaking News
Foto

बदलत्या हवामानात बांबू शेती एक उत्तम पर्याय - कुलगुरु डॉ. संजय भावे

दापोली (प्रतिनिधी) : दरवर्षी हवामानात होणारा बदल आणि बदलते निसर्गचक्र ज्यामुळे पडीक होत चाललेल्या जमिनीवर विद्यापीठाने विकसीत केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकऱ्याने बांबूची शेती केल्यास शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाकडे नेण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी केले. विद्यापीठामध्ये आयोजित बांबू परिषद २०२६ च्या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. ठाणे व महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विदद्यामाने कोंकण बांबु परिषद विदद्यापीठाच्या सर विश्वश्वैरया सभागृहात यशवी रित्या पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले की, बांबु हे अतिशय महत्वाचे पिक असून ते रोजगार निर्मिती, उदयोग निर्मिती व उत्पादन देणारे पिक आहे. त्याकडे एक उत्पन्नाचे साधन म्हणून त्यांची व्यावसायिक दृष्टया लागवड केली पाहिजे आणि तरुण पिढीने वा शेतीकडे वळण्यासाठी त्यांनी आवाहन केले. या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. ठाणेचे कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र बांबु प्रमोशन फाउंडेशन मुंबई, व्ही. गिरीराज, संचालक, कोकण बांबु व केन सेंटर, कुडाळ थी. संजीव कर्पे विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, नागपूरचे श्रीनिवास माडभूशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दोन दिवस चाललेल्या या महत्वपूर्ण परिषदेमध्ये बांबुची शास्त्रीय लागवड, रोपवाटीका व्यवस्थापन, बांबु प्रक्रिया, लहान व मोठे उदयोग संधी व आव्हाने, उपलब्ध बाजारपेठ या विषयावर सविस्तर चचर्चा झाली. यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले बांबु तज्ज्ञ, अभ्यासक, व्यवसायिक, बांबु उदयोजक यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या विविध ३० जिल्हयातून एकूण बांबू शेती संबधित ३७५ शेतकरी या परिषदेकरीता उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

तसेच या परिषदेत शेतकऱ्यांना बांबुच्या विविध प्रजातींची माहिती देणारे प्रदर्शन, बांबुच्या वस्तू, बांबुचे कपडे यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. बांबुवर आधरित उदोगाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन या परिषदेमध्ये करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात बांबु प्रक्षेत्र शिवार फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी रोपवाटीका व्यवसायीक यांचे सत्कार कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर पितांबरीचे डॉ. रविंद्र प्रभूदेसाई, व्ही. गिरीराज, संजीव कर्पे, श्रीनिवास माडभुशी, विदयापीठाचे, विस्तार शिक्षण संचालक, संजय तोरणे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अजय राणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg