loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील अडचणीतील काजू उद्योगाला आमदार किरण सामंत यांचा आशेचा " किरण "

देवळे (प्रकाश चाळके) - कोकणातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक सध्या काजू असून काजू व्यावसायिक व काजू कारखानदार मागील वर्षी काजू बीचे दर जास्त असल्याने आणि बाजारात काजूगराना म्हणावा तसा दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील काजू कारखानदार मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या चार-पाच वर्षापासून बाजारभावाचा चाललेला चढउताराचा खेळ अनेक काजू कारखानदारांना अडचणीचा ठरला असून अनेक कारखाने आज बंद अवस्थेत आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी आमदार भैय्या सामंत यांनी पुढाकार घेतला असून येत्या काही दिवसातच संबंधित अधिकाऱ्यांची व रत्नागिरी जिल्हा अधिकृत प्रक्रिया धारक संघाची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन आमदार भैय्या सामंत यांनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणचे प्रमुख पीक काजू मात्र आज काजू उद्योग अडचणीत आला आहे. या धर्तीवर रत्नागिरी काजू संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर व संचालक मंडळातील सदस्य यांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये 1) जिल्ह्यातला काजू जिल्ह्यमध्येच साठवणूक केला जावा, जेणेकरून सर्व कारखानदाराना किमान 10 महिने कारखाने चालविणे शक्य होईल. 2) तालुकास्तरीय गोदाम आणि CFC व्यवस्था. 3) काजूगराचे ब्रॅण्डिंग आणि विक्री. 4) माल तारण कर्ज योजना. आदी प्रमुख मागण्यावर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने लवकरच क्रुषी,महाराष्ट् पणन महामंडळ ,क्रुषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र काजू बोर्ड अशा काजू प्रकल्पाची संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची रत्नागिरी येथे काजू संघाची संयुक्त बैठक घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण नियोजनात प्रकाश चाळके, प्रताप पवार यांनी पुढाकार येऊन आमदार भैय्या सामंत यांच्याशी काजू प्रक्रिया धारक संघाची चर्चा घडवून आणली. येत्या काही दिवसातच संबंधित अधिकाऱ्यांची व काजूप्रक्रिया धारक संघाची बैठक बोलवण्याचे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले. यावेळी काजू संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर, कार्याध्यक्ष ओमकार कोलते, सचिव दिनेश पवार, संचालक सचिन जाधव, प्रकाश चाळके, तौफिक खतिब, सचिन जाधव, जयेश माजळकर, मोहसीन खतिब आणि शासकीय संपर्क प्रमुख प्रताप पवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg