loader
Breaking News
Breaking News
Foto

गावठी कट्ट्यांच्या विक्रीसाठी आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ' दोन गावठी कट्टे,दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कारसह ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

रसायनी (आनंद पवार) रायगड जिल्ह्यात अवैध शस्त्रांची विक्री करणारे आणि बेकायदेशीररीत्या गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक लेडी सिंघम श्रीमती आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या एका २८ वर्षीयतरुणाला जेरबंद केले आहे.या कारवाईत दोन गावठी बनावटीचे कट्टे,दोन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार असा एकूण ७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रविक्रीविरोधात विशेष लक्ष ठेवण्यात येत होते.दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या प्रीती पॅलेस हॉटेलसमोर गावठी कट्टे विक्रीकरण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.या माहितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी पथकासह तातडीने कारवाईचे नियोजन केले.त्यानुसार संबंधित ठिकाणी पोलिसांनी गोपनीयरीत्या सापळा रचला.संशयित इसम घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी योग्य संधी साधून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती आणि वाहनाची तपासणी केली असता दोन गावठी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एर्टिगा कारही पोलिसांनी जप्त केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम उल्हास पाटील (वय २८, व्यवसाय चालक),रा. पार आळी,शहापूर, ता.अलिबाग,जि. रायगड असे आहे. विशेष म्हणजे,या आरोपीविरोधात यापूर्वी २०२५ मध्ये पोयनाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील,पोलीस हवालदार रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत,शरद फरांदे,रणजितसिंह खराडे,मनोहर सिरतार तसेच पोलीस शिपाई प्रदीप खरात यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली ही कारवाई अवैध शस्त्रांच्या व्यवहाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.मात्र, केवळ शस्त्रे जप्त करून न थांबता कट्ट्यांचा पुरवठा नेमका कुठून झाला, त्यांचे संभाव्य खरेदीदार कोण होते आणि या अवैध शस्त्रविक्रीच्या मागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg