खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना "शाळा वाचवा, शिक्षण वाचवा" या मागणीसाठी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ - महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी ही भूमिका जाहीर केली. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या शाळा आणि अनुदानित शाळा या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यामुळे या शाळा बंद करणे, विलिनीकरणाच्या नावाखाली अस्तित्व कमी करणे योग्य नाही. शासनाने या शाळा अधिक सक्षम करून कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ठोस धोरण आखावे.
त्याचबरोबर राज्यात विनाअनुदानित शाळांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषद व अनुदानित शाळांवर परिणाम होऊ नये, यासाठी विनाअनुदानित शाळांना नवीन परवानग्या देण्याबाबत शासनाने पुनर्विचार करावा, अशी संघाची मागणी आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे. केवळ विद्यार्थीसंख्या कमी असल्याचे कारण देऊन शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये आवश्यक शिक्षक, वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, डिजिटल सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असते, त्यांच्यासाठी जवळची ZP शाळा हाच शिक्षणाचा आधार आहे. शिक्षण हा समाजाच्या भवितव्याचा पाया आहे. त्यामुळे सरकारने "शाळा बंद करण्याऐवजी शाळा सक्षम करा" हे धोरण स्वीकारावे.
संघाच्या प्रमुख मागण्या : १. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नयेत. २. जिल्हा परिषद व अनुदानित शाळा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ठोस धोरण आखावे. ३. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. ४. शाळांना आवश्यक निधी व पायाभूत सुविधा द्याव्यात. ५. विनाअनुदानित शाळांना नवीन परवानग्या देण्याबाबत पुनर्विचार करावा. ६. शाळा बंद/विलीन करण्यापूर्वी पालक, शिक्षक, स्थानिकांशी चर्चा करावी. ५ ऑक्टोबरचे हे आंदोलन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाने म्हटले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.