loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर येथे ग्रामपंचायत व जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ खालचीवाडीच्या सहभागाने वनराई बंधारा उभारणी

देवगड (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत कुणकेश्वर व जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ खालचीवाडी यांचे संयुक्त सहभागातून कुणकेश्वर गंगेचा वहाळ येथे वनराई बंधारे बांधण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, ग्रामपंचायत कुणकेश्वर माजी सरपंच महेश ताम्हणकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, कृषी सहायक सोनार जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण, सचिव विनय परब यांचे सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भविष्यातील पाणी टंचाई तसेच दुष्काळ या बाबींवर मात करणेसाठी व पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे उद्दिष्ट व सामाजिक बांधिलकी या बाबी डोळ्यासमोर ठेवून सदर कार्य हाती घेतलेच मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण यांनी या वेळी सांगितले. मंडळमार्फत रक्तदान शिबिर, शालेय स्पर्धासारखे उपक्रम पण राबवले जातात. या सर्व उपक्रमांचे मान्यवरांनी अभिनंदन करून मंडळाचे योगदानाबद्दल आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg