मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे सुपुत्र लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी कोकणच्या मातीतील सामाजिक वास्तवावर साकारलेला ‘गमन’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. २ ऑक्टोबरपासून कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिरासह राज्यातील विविध चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कणकवलीतील पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला. रोजगाराच्या शोधात कोकणातून मुंबई, पुणे तसेच परदेशात होणारे स्थलांतर, त्यामुळे ओस पडत चाललेली घरे, कमी होत जाणारी शाळांची पटसंख्या आणि गावाशी तुटत चाललेली नाळ, या सामाजिक वास्तवाचा वेध ‘गमन’मधून घेण्यात आला आहे. कधीकाळी माणसांच्या वर्दळीने गजबजलेली कोकणातील गावे आज शांत होत असून, त्याचा परिणाम पारंपरिक सण-उत्सवांवरही होत असल्याचे चित्रपटातून मांडण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा कोकणातील गावात राहणाऱ्या भाऊ आणि माई या वृद्ध दांपत्याभोवती फिरते. उपचारासाठी मुंबईत मुलांकडे आलेल्या या दांपत्याला शहरातील धावपळीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी आणि गावाची ओढ चित्रपटातून मांडली आहे. याचवेळी उत्तर प्रदेशातील पुरामुळे घर गमावलेले कुंदन आणि तारा हे बहीण-भाऊ रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाऊ-माई गावाकडे परतताना त्यांच्यासोबत कुंदन-ताराही गावात येतात. त्यानंतरच्या भावनिक प्रवासातून नाती, मातीची ओढ आणि स्थलांतराचे वास्तव उलगडते. “माझ्या मातीची कथा सांगण्याची नेहमीच इच्छा होती. गाव आणि शहरातील अंतर तसेच मानवमूल्यांचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक कलाकार आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून हा चित्रपट साकारला,” असे लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी सांगितले.
चित्रपटाची निर्मिती मानसी नाईक साटम यांनी केली असून लेखन व दिग्दर्शन मनोज नाईक साटम यांचे आहे. नारायण जाधव, श्रद्धा खनोलकर, दीपक कुमार, हर्षिका मेलेकर, सचिन वळंजू, निलेश भेरे, निलेश पवार, गणेश मांजरेकर, मानसी नाईक साटम, केदार गोडसे, आकांक्षा खोत, निकिता सावंत, प्रदीप वेलोंडे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. कास्टिंग डायरेक्टर रोहन पारकर, छायांकन शैलेश तांबे, संकलन सौरभ नामदेव नाईक, तर संगीत प्रशांत कांबळे यांचे आहे. ‘गमन’ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF २०२६) मधील मराठी चित्रपट स्पर्धा विभागासाठी निवड झाली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही चित्रपटाचे कौतुक झाले आहे. कोकणच्या मातीतील आणि कोकणच्या माणसांची कथा सांगणाऱ्या ‘गमन’ला जिल्हावासीयांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन लेखक-दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)







































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.