वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील बंद असलेल्या पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट) तातडीने दुरुस्ती करून प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्याबाबत महाराष्ट्र सेनेच्या शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर यांनी गुहागर येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता सुनील सूद यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शृंगारतळी बाजारपेठेतील अनेक पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे. यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, या काळात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली असते.
अशा परिस्थितीत बाजारपेठेतील पथदिवे बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिसरात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे चोरीसारख्या अनुचित घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच अंधारामुळे पादचारी व वाहनचालक यांच्यात अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, बाजारपेठेतील प्रकाशव्यवस्थेची ही स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. तरी आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठामपणे मागणी करण्यात येते की, शृंगारतळी बाजारपेठेतील बंद असलेल्या सर्व पथदिव्यांची तातडीने तपासणी करण्यात यावी. बंद असलेले पथदिवे व त्यांच्याशी संबंधित विद्युत यंत्रणेची आवश्यक दुरुस्ती करून प्रकाशव्यवस्था त्वरित सुरू करण्यात यावी. बाजारपेठेतील अंधाराची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी.
नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या कामाला प्राधान्य देऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताही विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी, ही अपेक्षा आहे. आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही कराल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अन्यथा, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढील भूमिका घ्यावी लागेल, याची कृपया नोंद घ्यावी. असे हे शेवटी निवेदनामध्ये वेदांत देवळेकर यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, शुंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे, मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, विवेक जानवळकर, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.