loader
Breaking News
Breaking News
Foto

नातूनगर मोहल्ला बसथांब्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; एकावर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील नातूनगर मोहल्ला बसथांब्याजवळ गोवा-मुंबई महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर खेड पोलिसांनी कारवाई केली. मंदार विजय मूकनाक (२७, रा. नातूनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मंदिर मुसकंडे यांच्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही परवाना नसताना तो नातूनगर मोहल्ला बसथांब्याजवळील महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दारुबंदी कायदा अन्वये खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg