loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख शिल्पा जगताप तर सल्लागार ॲड रेश्मा आंब्रे - अस्मिता साळुंखे

माणगाव (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या रायगड जिल्हा महिला आघाडीच्या विविध पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता आत्माराम साळुंखे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये शिल्पा जगताप यांची रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ॲड. रेश्मा आंब्रे आणि अस्मिता साळुंखे यांची महिला आघाडी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोदा येथील उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक, न्यूज नेटवर्कचे मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर, तसेच राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभाग अध्यक्ष तथा उद्योजक अजय तिडके यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात संघटनेचे महिला संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या नियुक्त्यांनंतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg