loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिर, कट्टा येथे अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा बाजारपेठ येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भेट देऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सुख- समृद्धीसाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले. हरिनाम सप्ताहात वीणा व चिपळी हाती घेत प्रमोद कामत भक्तिरसात तल्लीन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती तसेच देवस्थान समिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष साठविलकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी कांता भोगटे, कट्टा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रवीण गाड, मंदार मठकर, सागर माळवदे, अक्षय पावसकर, गणेश गाड, विनय मठकर, राजा पावसकर, जगदीश मोरजकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg