loader
Breaking News
Breaking News
Foto

एसपी नितीन बगाटेंची माणुसकी! थेट जिल्हा रुग्णालय गाठून दुःखी कुटुंबीयांना दिला धीर

रत्नागिरी (प्रतिनिधी) - क्रिकेटच्या मैदानावर भविष्य घडवण्याची स्वप्ने उराशी बाळगणार्‍या दोन अल्पवयीन खेळाडूंचा कोळंबे येथील पाणवठ्यात बुडून झालेला मृत्यू मन सुन्न करणारा ठरला आहे. या दुर्दैवी घटनेने अवघा परिसर शोकसागरात बुडाला असतानाच, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांना धीर देताना बगाटे यांच्यातील संवेदनशील अधिकारी पुन्हा एकदा दिसून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कल्याण क्रिकेट अकॅडमीचे शुभम यादव आणि सौरभ झा या दोघांचा वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. कार्यालयीन औपचारिकतेच्या चौकटीत न अडकता, कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वतः रुग्णालयात पोहोचून दुःखात बुडालेल्या कुटुंबीयांना धीर देण्याची त्यांची कृती लक्षवेधी ठरली आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुलांना गमावलेल्या पालकांच्या अश्रूंना शब्दांनी थोपवता येत नसले, तरी अशा कठीण प्रसंगी त्यांच्या जवळ उभे राहणे हा माणुसकीचा मोठा आधार असतो. पोलिस अधीक्षक बगाटे यांनी आपल्या उपस्थितीतून तो आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रुग्णालयात जाऊन केलेल्या सांत्वनामुळे पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेबरोबरच त्यामागील मानवी संवेदनाही या प्रसंगातून अधोरेखित झाल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg