दापोली (सागर गोवळे) : इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्ये रुजविण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगाव येथील तांत्रिक विभागाने सुरू केलेल्या ‘कौशल्य स्किल बॉक्स’ या अभिनव उपक्रमाची आता थेट शासनदरबारी दखल घेतली गेली आहे. या उपक्रमासंदर्भात विशेष शासकीय परिपत्रक निर्गमित झाले असून, ही बाब शाळेच्या दर्जेदार आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची मोठी पावती ठरली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात लोकमान्य टिळक विद्यामंदिराच्या 'मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन' विभागाच्या तज्ज्ञ पथकाने ‘कौशल्य स्किल बॉक्स’चे प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न केले.
या विशेष प्रशिक्षणासाठी रत्नागिरी परिसरातील तब्बल १५ शाळांचे सहशिक्षक उत्साहाने उपस्थित होते. कौशल्यांची ओळख करून देणे, त्यांच्यात प्रयोगशीलता वाढवणे आणि शालेय स्तरापासूनच व्यावसायिक शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या 'स्किल बॉक्स'मुळे विद्यार्थ्यांना विविध हस्तकौशल्यांचा थेट अनुभव मिळत असून शालेय शिक्षण अधिक रोजगाराभिमुख बनत आहे. ग्रामीण भागातील एका शाळेने सुरू केलेल्या या उपक्रमास अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. कैवल्य दांडेकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात आली. शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी या उपक्रमाला शासकीय स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. तंत्र शिक्षण विभागप्रमुख शैलेश खुळे यांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे यांचे नेतृत्व, तसेच तांत्रिक विभागातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अहोरात्र परिश्रमांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
एका ग्रामीण शाळेच्या उपक्रमाची शासन स्तराने घेतलेली दखल ही संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या यशामुळे भविष्यात अधिकाधिक शाळांपर्यंत कौशल्याधारित शिक्षण पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगावच्या संपूर्ण टीमचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.