loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुलीत दुष्काळजन्य परिस्थितीची जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

बांदा (प्रतिनिधी) - इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी दुष्काळामुळे भात पिकाचे झालेले नुकसान, पिकांची सद्यस्थिती व शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती त्यांनी क्षेत्रपालच्या तलाठी कोमल काकडे यांना दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पंचनामे योग्य पद्धतीने करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असा दिलासा नितीन राऊळ यांनी दिला. दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, क्षेत्रपाल तलाठी कोमल काकडे, पोलीस पाटील प्रिया कोठावळे तसेच परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg