loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ

डोंबिवली - डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. डोंबिवली येथे डी.एन.सी. शाळेच्या मैदानात आयोजित या उत्सवाच्या पहिल्या दिवशी नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागात सहभागी होऊन विधिवत पूजा अर्चा केली. प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. या महायागात मोठ्या संख्येने जोडप्यांनी सहभागी होत धार्मिक विधींमध्ये श्रद्धेने सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, बळीराजाला सुख-समृद्धी लाभावी, शेतीला नवसंजीवनी मिळावी आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या मंगल संकल्पनेतून या महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी देवीचरणी प्रार्थना करून राज्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनात समृद्धी नांदावी, त्यांना भरभराटीचे दिवस लाभावेत आणि सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, शांती व समाधान नांदावे, अशी मनोकामना व्यक्त केली. वैदिक मंत्रोच्चार, पूजाविधी आणि होमहवनाने भारलेल्या आणि सुंदर अशा तीर्थस्थळाची अनुभूती देणारा सभामंडप अशा या मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी सर्वांशी संवाद साधून सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ही दिल्या. यावेळी विविध मान्यवर मंडळी आणि भाविक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg