loader
Breaking News
Breaking News
Foto

वीर रेल्वे (महाड)स्टेशन ते गुहागर रेल्वे मार्ग बांधणे व रेल्वे सुरु करण्याबाबत कोकण संघटन समिती अध्यक्ष सूर्यकांत पागडे यांची मुख्यमंत्रांकडे मागणी

आबलोली (संदेश कदम) - कोकणातील लाखो प्रवासी रोज कोकण रेल्वेने मुंबई प्रवास करत असतात. त्याकरीता वेळेवर एस. टी. येत नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने विद्यार्थि, नोकरी व्यवसायाकरिता जाणारी जनता प्रवास करत असते, किंवा चालतही प्रवास करत असतात. पर्यायी प्रवास व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे विस्तारित मार्ग वीर रेल्वे स्टेशन(महाड) ते आंबेत- म्हाप्रल-मंडणगड तालुका- दापोली तालुका ते गुहागर तालुका पर्यंत रेल्वे मार्ग बांधणे व प्रवासाठी कायमस्वरूपी तोड़गा म्हणून कोकण रेल्वे विस्तारित सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. संपूर्ण कोकण विभागमधे व्यवसाय, उद्योग, व्यापार विकास, प्रगति व्हावी याकरिता ठोस उपाययोजना करावी. कोकण रेल्वे विस्तारित मार्ग वीर रेल्वे स्टेशन(महाड) ते गुहागर तालुका पर्यंत रेल्वे मार्ग बांधणे व रेल्वे सुरु करण्याबाबत आग्रही मागणी कोकण संघटन समितीच्या वतीने अध्यक्ष सुर्यकांत गोविंद पागडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्याकडे मांगणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg