loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील प्रख्यात बिजघर येथील स्वयंभू शंकर-पार्वती मंदिरात बार्शी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा!

संगलट (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बिजघर येथील प्रख्यात श्री शंकर-पार्वती, काळकाई व मानाई देवस्थानात यंदाचा बार्शी उत्सव मोठ्या उत्साहात, मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजनेते सदानंदराव नारायणराव भोसले यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सातगाव पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते नारायणराव भोसले यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, ठाणे तसेच अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या बिजघरच्या ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावत उत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भोर तालुक्यातील गोंधळी मंडळींनीही बारा दिवस देवीच्या चरणी आपली पारंपरिक सेवा रुजू केली. उत्सवादरम्यान पंचमीला रूपे लावण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडतो. देवीची विधिवत पूजा-अर्चा, विविध धार्मिक विधी आणि पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या देवस्थानावर अनेक जिल्ह्यांतील भाविकांची श्रद्धा असून, अनेक भक्त नवस बोलण्यासाठी तसेच नवसपूर्तीनंतर तो फेडण्यासाठी येथे येतात. उत्सवाच्या बारा दिवसांत प्रत्येक वाडीतील भजन मंडळांकडून मंदिरात सुश्राव्य भजनसेवा सादर केली जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गावातील ग्रामस्थ, समाजबांधव आणि पदाधिकारी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एकत्रितपणे सेवा बजावतात.

टाईम्स स्पेशल

या उत्सवाला कॅप्टन राजारामराव भोसले, पांडुरंगराव भोसले, उमेश राजारामराव भोसले, प्रवीण शांताराम चव्हाण, उदय भोसले, स्वप्नील किशोर भोसले, श्रीराम भोसले, संजय राव भोसले, विजय राव भोसले, भगवान मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी कृष्णाजीराव भोसले, अनंतराव भोसले, शिवाजीराव भोसले, केशवराव भोसले, माजी सरपंच यशवंतराव भोसले, राजेंद्र वामनराव भोसले, राजेंद्र भिकाजीराव भोसले यांच्यासह शेकडो समाजबांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण उत्सवातील धार्मिक विधी मंदिराचे पुजारी स्वामी भगवान बुवा जंगम यांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्तमरीत्या पार पाडले. ग्रामस्थांच्या एकजुटीने, भाविकांच्या श्रद्धेने आणि सेवाभावी सहभागाने बिजघर येथील बार्शी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg