loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचे जामीन अर्ज फेटाळले !

रत्नागिरी, ११ नोव्हेंबर (वार्ताहर) : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा अपयश आले आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय दिला. जामिनासाठी आंबेरकर याने तब्बल ४९ परिच्छेदांचा सविस्तर अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, कोडवली येथील हॉटेल सरस्वतीजवळ पंढरीनाथ आंबेरकर याने आपली महिंद्रा थार गाडी विरुद्ध दिशेने चालवत शशिकांत वारीशे यांच्या ऍक्टिव्हा दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांचा कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबेरकरला अटक झाली. त्यांने जामीनासाठी केलेले सर्व अर्ज फेटाळण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरकारी पक्षाने जामीन अर्जांना विरोध दर्शविला. या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप नोंदवायची असल्याने आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा त्यांना धमकावले जाण्याची शक्यता असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. विशेष म्हणजे, आंबेरकर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करणारे तब्बल ४७ अर्ज स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सादर केल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर मांडली. प्रकरणाचे गांभीर्य, साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि खटल्याची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने आंबेरकर याचे निशाणी क्रमांक ३१९ आणि ३२८ वरील दोन्ही जामीन अर्ज फेटाळले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg