loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगरपालिकेच्या कारवाईमद्धे फुड-ट्रकवाल्यांची होरपळ

पनवेल : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व महिलांना स्वत:च्या पायावर उभ राहता यावं म्हणुन महाराष्ट्र शासनाने अनेकांना फुडट्रक दिलेले आहेत. या फुडट्रकवर बँकलोन असल्याने त्यांचे मासिक हफ्ते सुरू आहेत. मात्र महानगरपालिकेच्या कारवाईमद्धे या फुडट्रकवाल्यांची होरपळ सुरू आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढून पनवेल मनपाचे या विषयावर धोरण तयार करावे, या मागणी संदर्भात महिला व बालकल्याण अध्यक्षा ममता म्हात्रे यांच्यासोबत पनवेल मनसे शहराध्यक्ष योगेश चिले, अवनी या संस्थेचे संस्थापक अनिल फोंडेकर, अ‍ॅड. प्रतिक सोमवंशी व इतर फुडट्रक चालकांनी चर्चा केली. लवकरच या संदर्भात योग्य ते धोरण ठरवु असे आश्वासन ममता म्हात्रे यांनी दिले. यावेळी मनसे सचिव पराग बालड यांच्यासह मनसे विभाग सचिव हर्ष खैरे तसेच असंख्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg