loader
Breaking News
Breaking News
Foto

पाली देवतळे परिसरामध्ये सुरु असलेल्या साथीला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानूची प्रतिबंधक मोहिम

रत्नागिरी : तालुक्यातील पाली देवतळे परिसरामध्ये हिवताप आणि डासजन्य आजारांचा संभाव्य धोका रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानूच्या वतीने धडक ताप सर्वेक्षण आणि डास प्रतिबंधक मोहीम राबवली जात आहे. २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान आरोग्य पथकाने या भागातील सुमारे ९३ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन सखोल पाहणी केली. सर्वेक्षणादरम्यान कर्मचार्‍यांनी ५५१ पाण्याच्या साठ्यांची (कंटेनर) बारकाईने तपासणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये ८ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने तात्काळ कार्यवाही करण्यात आली. डासोत्पत्ती रोखण्यासाठी ३ साठे रिकामे करण्यात आले, ३ ठिकाणी अ‍ॅबेट औषध टाकण्यात आले, तर २ ठिकाणी जैविक नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण परिसरात धूर फवारणी (फॉगिंग) करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टाईम्स स्पेशल

या मोहिमेत प्रा.आ.केंद्र खानूचे वैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर विभागाचे समन्वयक, जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य पर्यवेक्षक, कीटक संहारक आणि स्थानिक आशा सेविका प्रत्यक्ष उतरल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, तीन दिवसांच्या या मोहिमेत एकही तापग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. आरोग्य विभागाने नागरिकांना आपल्या परिसरामध्ये पाणी साचू न देण्याचे आणि खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg