loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तहसीलदार कार्यालय परिसरात झाडीझुडपांचे साम्राज्य; लाखोंचे शौचालय बंद, नागरिकांची फरफट!

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालवणार्‍या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातच झाडीझुडपांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयाच्या मागील व बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली असून, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय कामांसाठी दररोज येणार्‍या नागरिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. झाडीझुडपांमुळे साप आणि इतर कीटकांचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दाखले, शासकीय योजना आणि विविध प्रशासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून येणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होत नसेल, तर सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या सुविधेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शौचालय बंद असण्याचे नेमके कारण काय आणि ते नागरिकांसाठी कधी खुले होणार, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज आहे.

टाईम्स स्पेशल

कार्यालय परिसरातील झाडीझुडपे तातडीने हटवून स्वच्छता करावी आणि सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी सुरू करावे, अशी मागणी होत आहे. तालुक्याच्या प्रमुख प्रशासकीय कार्यालयातच नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी गैरसोय सहन करावी लागत असेल, तर ही बाब गंभीर मानली जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी या परिस्थितीची पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार का? याकडे दोडामार्गवासीयांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg