loader
Breaking News
Breaking News
Foto

हातखंबा पोलीस मदत केंद्रात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा; पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांचा कौतुकास्पद पुढाकार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या हातखंबा पोलीस मदत केंद्रात आता प्रवासी तसेच कर्तव्यावर असणार्‍या पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक घुले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांनी पुढाकार घेत केंद्रामध्ये अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर (ऍक्वागार्ड) कार्यान्वित केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज हजारो वाहने आणि प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान अनेकदा नागरिक काही अडचणी किंवा मार्गदर्शनासाठी हातखंबा पोलीस मदत केंद्रात येतात. अशा वेळी केंद्रात येणार्‍या प्रवाशांना तसेच चोवीस तास महामार्गावर सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था राखणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन अंमलदार नितीन जाधवर यांनी तातडीने पावले उचलत स्वतः पुढाकार घेतला आणि केंद्रात ऍक्वागार्ड बसवून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांनी केलेल्या या संवेदनशील कार्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांमधून आणि महामार्गावरील प्रवाशांमधून मनःपूर्वक कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg