मालवण (प्रतिनिधी) - महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मालवण कुंभारमाठ येथे आयोजित कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या वेदांत खालाडे याने १७ व १९ वर्षा खालील अशा मुलांच्या दोन्ही गटात विजेतेपद मिळविले. तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या गीत जगताप हिने तर १९ वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या अनन्या जोशी हिने विजेतेपद मिळविले. कुंभारमाठ येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज जवळील माघी गणेश हॉल येथे आयोजित या टेबलटेनिस स्पर्धेचे उदघाट्न शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार तथा कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे अध्यक्ष संजय कडू, मॅनेजिंग कमिटी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव, विलास परुळेकर, दिलीप हुनारी, सतीश पिंगळे, पी. एस. शिंदे, नितीन तळेकर, पंकज पेडणेकर, गुरुनाथ राणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. या विभागीय स्पर्धेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांमधील खेळाडू, प्रशिक्षक, पंच व क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १७ वर्षाखालील मुले, मुली व १९ वर्षाखालील मुले, मुली या गटातील स्पर्धा झाल्या. या गटातील स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - १७ वर्षाखालील मुले - विजयी - वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजयी- जुनेद मगदूम (कोल्हापूर), १७ वर्षाखालील मुली - विजयी गीत जगताप (कोल्हापूर), उपविजयी - वर्षा परुळेकर (सिंधुदुर्ग). १९ वर्षाखालील मुले - विजयी - वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजयी - अवधूत चौधरी (सोलापूर), १९ वर्षाखालील मुली - विजयी - अनन्या जोशी (कोल्हापूर), उपविजयी - निहाली पाटील (कोल्हापूर). या गटातील स्पर्धेचे बक्षीस वितरण मालवणी कवी रुजारिओ पिंटो, संजय कडू, विष्णू कोरगावकर, दिलीप हुनारी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.