loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरावस्था; रिक्षासंघटना आक्रमक, आंदोलनाच्या पवित्र्यात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याची गेल्या तिन वर्षांपासून दूरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वाढली असून रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. यावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. यावर अनेकवेळा आवाज उठुनही कोकणरेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येथील रिक्षासंघटना आक्रमक झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मागणिनुसार आंदोलनाच्या माध्यमातून सहा वर्षांपूर्वी हे स्थानक अस्तित्वात आले. आजही या स्थानकाला प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवासी उतरण्याची संख्या कमी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानकात दिवा रत्नागिरी ही एकच पॅसेंजर थांबत असली तरी क्रॉसिंगला इतर गाड्या थांबत असतात. त्यामुळे बर्‍यापैकी प्रवाशी येथे उतरत असतात. त्यातून कोकण रेल्वेला चांगले उत्पन्न ही मिळत आहे. मात्र कोकणरेल्वे प्रशासनाचे कायम या स्थानकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकतेच या स्थानकावर काही गाड्या थांबण्यासाठी मनसेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. या स्थानकात पिण्याच्या पाण्यापासून अनेक गैरसोई आहेत. स्थानकाची निर्मिती झाल्यापासून या स्थानकाकडे येणारा रस्ता दुर्लक्षितच आहे. गेली तीन वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

टाईम्स स्पेशल

मात्र अनेकवेळा मागणी करूनही कोकणरेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. रस्त्याचा दुतर्फा गर्द झाडीही वाढली आहे. रस्त्याची ही अवस्था पाहून येथील रिक्षसंघटना आक्रमक झाली आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. याची दखल घेत हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे. यावर कोकणरेल्वे प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे कडवई पंचक्रोशी तील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg