loader
Breaking News
Breaking News
Foto

मासू गावातील जुनी फौजदारवाडी येथे प्रत्येक घरोघरी नळ पाणी योजनेद्वारे पाणी देणार - राजेशदादा मासवकर

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मासू गावातील जुनी फौजदारवाडी येथे प्रत्येक घरोघरी नळ पाणी योजनेद्वारे पाणी देणार असा संकल्प मासू गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते राजेशदादा मासवकर आणि ग्रामस्थानी केला असून हा संकल्प प्रत्यक्ष सत्यातही उतरवून जुनी फौजदारवाडी येथे प्रत्यक्ष नळपाणी योजनेचे काम चालू झाले असून यासाठी ग्रामस्थांनी लोक वर्गणी जमा केली आणि राजेशदादा मासवकर यांनी विविध संस्थेमार्फत दोन लाख रुपये रक्कम डोनेशन म्हणून जमा केली. पाणी साठवण टाकी साठी स्वतःची जागा विनामूल्य दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिक रक्कम लागली तर डोनेशनद्वारे देणगी जमा करून नळ पाणी योजना पूर्णत्वास नेणार आणि जुनी फौजदार वाडीतील 27 घरांना नळ पाणी योजनेतून पाणी मुख्य पुरवठा करणार असा संकल्प वजा निर्धार राजेशदादा मासवकर यांनी केला आहे. ही नळ पाणी योजना पूर्णत्वास जावी म्हणून मुख्य सूत्रधार चंद्रकांत अवरे, संदीप अलीम, नितीन मोरे, संदेश अलीम, प्रकाश मसुरकर, प्रदीप अलीम, मंगेश, नारायण, रवी, सचिन अवेरे, रोहित, प्रितेश यांच्यासह जुनी फौजदारवाडीतील वडीलधारी मंडळी, छोटी मंडळी आणि प्रामुख्याने महिला वर्गाने उस्फूर्तपणे नळ पाणी योजनेच्या कामात सहभाग घेतला असून ही योजना पूर्णत्वास नेत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg