loader
Breaking News
Breaking News
Foto

देवस्थानांचे वहिवाटदार, आणि कुळ असलेले शेतकऱ्यांना हानीभरपाई द्या, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खेड येथे मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी

खेड - सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या भूमी आणि संबंधित अधिकृत वहिवाटदार, तसेच कुळ असलेले शेतकरी यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच हानीभरपाई द्यावी, अशी मागणी मंदिर महासंघाने सरकार अन् प्रशासन यांच्याकडे केली आहे. मंदिर महासंघाच्या वतीने या मागणीचे मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन खेडचे तहसिलदार सुधीर सोनवणे यांना देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात उपस्थित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण सूत्रे ! १. सरकारच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हानीभरपाई आणि साहाय्य देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे; परंतु अत्यंत दुर्लक्षित भाग म्हणजे, देवस्थान इनाम सनदधारक (वहिवाटदार) आणि कुळ म्हणून शेती कसणाऱ्या अधिकृत असलेल्या घटकांना, तसेच राज्यातील देवस्थानांना या साहाय्य प्रक्रियेपासून हेतूपूर्वक वंचित ठेवले जात आहे. २. अधिकृत असलेल्या वहिवाटदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यांवर इतर हक्कात नोंद असल्याने त्यांना अधिकृत ‘शेतकरी ओळखपत्र / फार्मर आयडी’ देता येत नसल्याचे कारण देत सरकारच्या साहाय्यापासून डावलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

३. महाराष्ट्र सरकारने घेतलेले सरसकट पंचनामे आणि साहाय्याचे आदेश यांची ही उघड पायमल्ली असून यामुळे देवस्थान इनाम भूमी कसणाऱ्या अधिकृत वहिवाटदार, तसेच कुळ असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खेड येथे निवेदन देतांना मंदिर महासंघाचे साखर येथील संतोष उतेकर, बिजघर येथील सुनील भोसले, कासई येथील गणेश उतेकर, खारी येथील विनोद बहुतुले, श्रीकांत बहुतुले, चाकाळे येथील महेंद्र जाधव, भिलारे आयनी येथील ओम भिलारे, मंदिर महासंघाचे सुरेश शिंदे आणि विलास भुवड यांच्यासह चिंचघर येथील प्रदीप चव्हाण, तळवट-पाल येथील मिलिंद पालांडे, तिसे येथील प्रवीण घाणेकर, पुरे बु; येथील सुनील पवार आदी हिंदुत्वनिष्ठ सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg