loader
Breaking News
Breaking News
Foto

वणौशीत कृषी विद्यापीठातर्फे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक; महिलांना रोजगाराची नवी दिशा

(दापोली: सागर गोवळे)वणौशी / दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी स्नेही’ गटातर्फे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वणौशी (बारेवाडी) येथे महिलांसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. दुधाचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्‌या सक्षम करणे आणि अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रात्यक्षिकादरम्यान काळेश्वरी आणि समर्थ महिला बचत गटातील महिलांना मिष्टी दोई, आम्रखंड आणि खोवा बर्फी यांसारखे पौष्टिक व मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे थेट प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच दुग्धजन्य पदार्थांचे पोषणमूल्य, स्वच्छता, योग्य साठवणूक, प्रक्रिया आणि त्यांची बाजारपेठेत विक्री (विपणन) कशी करावी, याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दुधावर प्रक्रिया करून विक्रीयोग्य पदार्थ तयार केल्यास घरगुती वापरासोबतच चांगला व्यवसाय उभारता येतो, हा संदेश यावेळी महिलांना देण्यात आला. या उपक्रमात बचत गटाच्या महिलांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला.

टाइम्स स्पेशल

हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेष तज्ज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘कृषी स्नेही’ गटातील विद्यार्थिनी समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कृषी विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाची एक नवी वाट सापडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg