loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

जालगाव, दापोली : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत दापोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव, दापोली येथे दि. 17-11-2026 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद रत्नागिरी, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रशिक्षणात ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याचे मार्ग, ग्रामसभेचे महत्त्व तसेच प्रभावी प्रशासन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाविषयी समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत प्रशिक्षणार्थींनी सत्र संचालक शिरीष चौगुले, प्रविण पाटील, डॉ. संजय सावंत, सरपंच नंदकुमार कदम व स्वप्निल भोपळे यांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg