loader
Breaking News
Breaking News
Foto

जी. जी. पी. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाच विद्यार्थिनींची विभागस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी:- सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विजय संपादन करून रत्नागिरी येथील जी. जी. पी. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या बॅडमिंटन संघातील कु. वल्लरी देवस्थळी, कु. परिणिती कदम, कु. ओवी वीरकर, कु. मिहिरा कांबळे आणि कु. अन्वि मुळे या पाच विद्यार्थिनींची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देणे, त्यांची शारीरिक क्षमता वाढवणे आणि त्यांना स्पर्धात्मक खेळांचा अनुभव मिळवून देणे, या दृष्टीने शालेय क्रीडा स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. बॅडमिंटनसारख्या खेळामुळे विद्यार्थिनींमध्ये चपळता, एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होण्यास मदत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवड झालेल्या विद्यार्थिनींना शाळेचे प्रशिक्षक श्री. प्रमोद कदम आणि सौ. पूनम नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, दिलेले प्रोत्साहन आणि केलेल्या मार्गदर्शनाबद्दल विद्यार्थिनींनी त्यांचे आभार मानले.या विद्यार्थिनींच्या निवडीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, पालक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg