loader
Breaking News
Breaking News
Foto

शारदादेवी उत्सवानिमित्त वरवेली शाळा नं. १ मध्ये भोंडला (पानाफुलांची) रांगोळी स्पर्धा उत्साहात

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये शारदादेवी उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली भोंडला (पानाफुलांची) रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत पानाफुलांच्या साहाय्याने आकर्षक व सुंदर रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली. शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर तसेच शिक्षिका अर्चना वाकडे व धनश्री सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमध्ये नवेतश गणेश रांजाणे, समर शशिकांत रांजाणे, अक्षत संदीप रांजाणे, अंजली अंकुश चांदोरकर, हर्ष प्रीतम गमरे, आराध्य मनोज किर्वे, कस्तुरी अंकुश चांदोरकर, सारंग जितेंद्र झगडे, विभा अरुण सुर्वे, रूहानियत गणेश रांजाणे, आरोही मनोज किर्वे आणि विहान जितेंद्र झगडे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पाने व रंगीबेरंगी फुलांचा कल्पकतेने वापर करून सुंदर रांगोळ्या साकारल्या. या रांगोळ्यांमधून विद्यार्थ्यांची कलात्मकता, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी पालकांसह गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.

टाईम्स स्पेशल

या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप रांजाणे, माजी अध्यक्ष विशाल रांजाणे, पत्रकार गणेश किर्वे, अविनाश रांजाणे, विद्या चांदोरकर, आशिकी चांदोरकर, पोर्णिमा गमरे, दिपाली पवार, जितेंद्र विचारे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, लावण्या रांजाणे आदी मान्यवर उपस्थित होते. शारदादेवी उत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सुंदर पानाफुलांच्या रांगोळ्यांचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg