loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन उत्साहात साजरा

मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त मालवण येथे एकता मित्रमंडळ, मालवण आणि ग्लोबल रक्तदाते, मालवण-सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सेवा संकल्प अभियान व ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरपालिका बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक मंदार ओरोसकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, आदी मान्यवर तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबिरासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने डॉ. भारती ठोंबरे, डॉ. शिवम देशमाने, सुमगल बुगडे, भूषण मळेकर, जोसेफ पिंटो, भक्ती शिरसाठ, कांचन परब, नितेश पाटील, गणपत गाडगे, खुमाजी बिले आणि नितीन गावकर यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg