loader
Breaking News
Breaking News
Foto

गणित संबोध परीक्षेत शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

देवगड (प्रतिनिधी) : गणित विषयातील विद्यार्थ्यांची आवड, आकलनशक्ती आणि तर्कशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने सिंधुदूर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षा २०२६ - २७ मध्ये शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत प्रशालेच्या यशात भर घातली. इयत्ता पाचवीतील एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यामध्ये आरुष हरिश्चंद्र पेंडूरकर व रोशन केदार सावंत यांनी प्रत्येकी ९८/१०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनुश्री स्वप्निल पवार व स्वरा जगदीश शिंदे यांनी ९६/१०० गुणांसह द्वितीय क्रमांक, तर ध्रुवी सिद्धांत शेडगे व निधी मनोज सावंत यांनी ९४/१०० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता आठवीतील एकूण ११ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यामध्ये श्रीमा मुकुल प्रभूदेसाई व पूर्वा गजानन राणे यांनी ९८/१०० गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. अनन्या ज्ञानेश्वर कुंभरे हिने ९६/१०० गुणांसह द्वितीय क्रमांक, तर प्रज्योत दिलीप कदम व अद्वैत धनंजय भिडे यांनी ९४/१०० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थापदाधिकारी ,प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg