मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पाले नंबर १ येथे जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या वतीने शाळेतील उपशिक्षक सुनील जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेत नव्याने रुजू झालेल्या पदवीधर शिक्षक सौरभ काटोले यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांसोबतच बालकांच्या प्राथमिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका अपर्णा खांबे व मदतनीस दिपीका मोहिते यांचाही यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिजीत देवळेकर म्हणाले, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. शिक्षकांच्या संस्कारातूनच समाजाला जबाबदार, सुजाण आणि सक्षम नागरिक मिळतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा सदैव आदर केला पाहिजे.” अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याबद्दल अभिजीत देवळेकर म्हणाले, “बालकाच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे ही त्याच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांना केवळ पोषण आहार किंवा पूर्वप्राथमिक शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्यात स्वच्छतेच्या सवयी, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अनेक कुटुंबांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
कार्यक्रमादरम्यान अभिजीत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण लाभले. या कार्यक्रमास भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, भाजपा मंडणगड तालुका उपाध्यक्ष विजय दुर्गवले, सामाजिक कार्यकर्त्या सानिका दुर्गवले, उपशिक्षक सुनील जाधव, पदवीधर शिक्षक सौरभ काटोले, अंगणवाडी सेविका अपर्णा खांबे, अंगणवाडी मदतनीस दीपिका मोहिते, तसेच करीना दुर्गवले, एकता दुर्गवले आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. शिक्षकांचा सन्मान, नव्या शिक्षकांचे स्वागत, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप यामुळे पाले नंबर १ शाळेतील जागतिक शिक्षक दिनाचा उपक्रम शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.